संगमनेर प्रतिनिधी (दि.३० मे):-कार मधुन गांजाची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी वाहनाला पकडून वाहन चालकाकडून १८ हजार रुपयांचा गांजा जप्त केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजनेच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या कोल्हेवाडी परिसरात घडली आहे.गांजा विक्रीला बंदी असताना कार मधुन गांजाची वाहतूक करताना आढळल्याने पोलिसांनी या वाहनाला पकडून पोलिसांनी वाहन चालकाकडून १८ हजार रुपयांचा गांजा जप्त केल्याची घटना काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरात लगतच्या कोल्हेवाडी रोड परिसरात घडली.कोल्हेवाडी रस्त्यावरून टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या नेक्सॉन कार मध्ये (क्रमांक एम.ए 12 क्यु. एम.4985 ) गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली.पोलिसांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास या ठिकाणी जाऊन पाहणी केली.या ठिकाणी असणाऱ्या चर्चजवळ पोलिसांनी या कारला अडवले.या कारची झडती घेतली असता या कारमध्ये १८ हजार रुपये किमतीचा २ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा आढळला.काळपट हिरवट रंगाची पाने,फुले, काड्या व बिया असलेले कॅनाबीस या वनस्पतीचे शेंडे उग्रवास येत असलेला गांजा खाकी रंगाचे प्लॅस्टीकचे सेलोटेप मध्ये हा गांजा गुंडाळलेला होता.पोलिसांनी गांजा सह कार जप्त केली.याबाबत पोलिसांनी संदिप विष्णु पालांडे,वय 39 वर्षे,रा.महात्मा गांधी वसाहत,शिवाजीनगर,पुणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहे.गांजावर शहर पोलिसांनी केलेली कारवाई ही कौतुकास्पद आहेच परंतु नव्यानेच बदलून आलेले शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यापुढे अवैध धंद्यावाल्यांचे एक आव्हानच आहे गुटखा,अवैध दारू वाहतूक,मटका,गोमांस विक्री छुप्या पद्धतीने सुरूच आहे यावर वेळीच आळा घातला पाहिजे अशी नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
