अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० एप्रिल):-माळीवाडा बस स्थानक परिसरात गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्या कडून ३६,००० रू.चा माल जप्त करण्यात आला असून दि.२९ मे रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,माळीवाडा बसस्थानक परिसरात काही इसम त्यांचे मोटारसायकल वरुन गांजा सारखा अंमली पदार्थ विक्री करीता घेवुन येणार आहेत.अशी माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी माळीवाडा बसस्थानक परिसरात सापळा लावला असता काही वेळातच तेथे एका दुचाकी वाहनावरुन दोन इसम त्यांचे कडील पाठीवरील बँगेसह सदर ठिकाणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने व ते पोलीसांना पाहून सदर ठिकाणावरुन पळून जाण्याचा तयारीत असतांना त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांच्याकडील बॅगची पाहणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये अंमली पदार्थ गांजा असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्याने नावे १) सुनिल राम पवार वय २२ वर्षे रा चिचोली फाटा ता.राहुरी जि. अहमदनगर २)अशोक उत्तम फुलमाळी वय २१ वर्षे रा शास्त्रीनगर चांदा ता.नेवासा, जि.अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यांच्या ताब्यात काळपट, हिरवट रंगाची पाने,फुले काडया व बिया असलेले केनाबीस या वनस्पतीचे शेंडे म्हणजे गांजा हा २ किलो २६ ग्रॅम व एक दुचाकी मोटारसायकल असे एकून ३६,७८५/- मुददेमाल कब्जात बाळगुन गांजाची विक्री करण्याचे उददेशाने दुचाकरीवर वाहतुक करतांना मिळुन आले असून झाले कारवाई बाबत पाहेकॉ/ २०१८ तनवीर महंमदअली शेख यांचे फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५६५/२०२३ अंमली औषधे द्रव्य मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(क) सह २०(ब) (२) (क), २९ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोनि/चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई/मनोज कचरे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,परि.पोलीस उपाधिक्षक अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ तनवीर शेख,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/अब्दुलकादर इनामदार,पोना/योगेश खामकर,पोना/सलीम शेख, मपोना/कविता गडाख,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/सागर मिसाळ, पोकॉ/अतुल काजळे, मपोकॉ/हिना बागवान, मपोकॉ/छाया गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
