अहमदनगर प्रतिनिधी(दि.३० मे):-शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखू बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीं विरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यातून 17,35,200 रू.किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की इसम नामे अल्ताफ पठाण राहणार नाईकवाडापुरा तालुका नेवासा हा त्याचे मुलांना मार्फत पांढऱ्या रंगाचे हुंदाई क्रेटा गाडी मधून शेवगाव ते नेवासा रोडने गुटका पान मसाला व सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर रित्या वाहतूक करीत आहे आता गेल्यास मिळवून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देऊन शेवगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंचांना सोबत घेऊन बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलीस स्टेशनच्या अंमलदार व पंचांना सोबत घेऊन बातमीतील नमूद ठिकाणी दिशा ऍग्रो इंडस्ट्रीज भायगाव तालुका शेवगाव येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असताना शेवगाव कडून येणारे रोडने एक पांढऱ्या रंगाची कार त्यांना दिसली पंचांची खात्री होताच कार चालकास बॅटरीचे सहाय्याने थांबण्याचा इशारा करताच कार चालकाने गाडी थांबवले त्यावेळी कारमध्ये तिन इसम दिसले त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून वाहनाची पाहणी करता पांढऱ्या रंगाचे हुंडाई क्रेटा गाडीमध्ये गोण्या ठेवलेली दिसले सदर गोण्यांची पंचा समक्ष पाहनी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधात असलेल्या गुटखा पान मसाला व तंबाखू असलेले खात्री झाली गाडीतील सर्व इसमांना ताब्यात घेतले ताब्यात त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)मुजिम अल्ताफ पठाण वय ते 33 2) अजीम अल्ताफ पठाण वय 30 3) परवेज असिफ पठाण वय 27 सर्व राहणार नाईक वाडा पुरा तालुका नेवासा असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडील गाडीतील गुटखा पान मसाला व तंबाखू बाबत विचारपूस करता यातील आरोपी एक व दोन यांनी माझे वडील 4) अल्ताफ इमान खान पठाण राहणार नाईकवाडापुरा तालुका नेवासा (फरार) यांच्या सांगण्यावरून इसम नामे 5) नाना उर्फ आदिनाथ जाधव राहणार पांढरवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड(फरार) यांच्याकडून विक्री करता आणलेली आहे अशी कबुली दिली.वरील तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 1,92,000 रू. किमतीचा हिरा गुटखा विविध प्रकारचा पान मसाला, 43,200 रू. किमतीची रॉयल तंबाखू व 15,00,000 रू. किमतीतील पांढऱ्या रंगाचे हुंडाई क्रेटा कार असा एकूण 17,35,200 रू. किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीर रित्या कापतात बाळगून वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार शिवाजी ढाकणे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/सचिन आडबल,पोकॉ/शिवाजी ढाकणे,पोकॉ/रणजीत जाधव,मेघराज कोल्हे,अमृत आढाव यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
