अहमदनगर प्रतिनिधी (दि.३० मे):-दि.29 मे 2023 रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) मार्फत नाविक मालिकेतील एन.व्ही.एस.-०१ (नेव्हीगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) या दिशादर्शक उपग्रहाचे ‘जी.एस.एल.व्ही. एफ१२’ या प्रक्षेपकाच्या साह्याने सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा येथुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.या प्रक्षेपणाचे प्रत्यक्ष अनुभव व साक्षीदार ठरलेली स्नेहालय संचलित बालभवन ची विद्यार्थिनी अर्चना राजू दिनकर रा.रामवाडी,अहमदनगर अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अर्चना स्वतःचे शिक्षण घेत आहे.ती अभ्यासात कमालीची हुशार आहे.त्याच बरोबर भाषण,सुत्रसंचालन व एन.सी.सी.या क्षेत्रात देखील आपल्या गुणवत्तेचा ठसा तिने उमटविला आहे.स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्प हा गेल्या 15 वर्षांपासून अहमदनगर शहरातील सात झोपडपट्ट्यांमधील लोकांचे जीवन बदलण्यासाठी आरोग्य,शिक्षण व संस्कार यांवर काम करत आहे. बालभवन नेहमीच गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देत आले आहे. यांमधीलच स्कॉलरशिप गटाची अर्चना ही विद्यार्थ्यींनी आहे.अर्चनाने भविष्यात शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न उराशी बाळगले आहे.त्यासाठी बालभवन अर्चनाला सर्वतोपरी मदत करुन तिच्या पंखांना बळ देणार आहे. स्नेहालय अनिवासी प्रकल्प संचालक हनिफ शेख सर, प्रकल्प व्यवस्थापक उषा खोल्लम व बालभवन शिक्षकवृंद यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
