शहर वाहतूक पोलिसांनी अनपेड चलन विशेष मोहिमेअंतर्गत १५ लाख रुपये केले वसूल;वाहतूक नियमभंग करणारे वाहन चालकांविरुद्ध देखील विशेष मोहीम
अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ जुन):-अहमदनगर वाहतुक पोलीसांची अनपेड चलान वसुलीची विशेष मोहीमे अंतर्गत मे २०२३ मध्ये १५ लाख रु.वसुल,वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द देखील विशेष कारवाई जिल्हयामध्ये सन २०१९ पासुन वन स्टेट वन ई चलान प्रणाली अंतर्गत ई चलान सुरु करण्यात आलेले असुन त्याद्वारे वाहतुक नियमभंग करणारे कसुरदार वाहनचालक यांचे विरुध्द कारवाई करण्यात येत आहे.ई चलान प्रणालीद्वारे कसुरदार वाहनचालक यांचे विरुध्द कारवाई केल्यानंतर सदर वाहनचालक यांना दंडाचा भरणा करणेकरीता १५ दिवसांची मुदत देण्यात येते.परंतु बरेचशे वाहनचालक सदर दंडाचे रक्कमेचा भरणा करीत नाहीत.त्यामुळे अहमदनगर जिल्हयात अनपेड दंडाची रक्कम मोठी असल्याचे निदर्शनास आल्याने श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ मोरेश्वर पेंदाम यांनी शहर वाहतुक शाखा नेमणुकीतील अधिनस्त ग्रेड पोउनि/ पाटोळे,सय्यद व अंमलदार यांचे सह विशेष मोहीमे अंतर्गत अहमदनगर शहरातील विविध चौकांमध्ये दि.०१ ते २०२३ ते ३१ मे २०२३ रोजी पर्यंत अचानक नाकाबंदीचे आयोजन करुन नाकाबंदी दरम्यान अनपेड दंडाचे रक्कमेची वसुली करणेची मोहीम राबविण्यात आली.सदर मोहीमेअंतर्गत ३१४५ वाहनचालकांकडुन एकुण १५,३७,१००/- रु. दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे.त्याच प्रमाणे वाहतुक नियमभंग करुन वाहन चालविणारे एकुण ४७५२ वाहनचालकां विरुध्द कारवाई करून एकुण २६,०२,८००/- दंडाची आकारणी करण्यात आली.त्यामध्ये प्रामुख्याने विना हेल्मेट दुचाकी चालविणारे २२९,विना सिटबेल्ट १८२४,मोबाईल टॉकींग १०४,धोकादायकरित्या माल वाहतुक करणे ३७३, नंबरप्लेट विषयी अपराध-१७२,काळी काच ८१,वाहतुकीस अडथळा २७०,ट्रिपल सिट ३२७,अवैध प्रवासी वाहतुक -१९ व ड्रंक अँड ड्राईव्ह ०५ इ.वाहतुक नियमांचा भंग करणारे व प्राणांतिक अपघातांस कारणीभुत ठरणारे वाहनचालकां विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.तसेच सदर वाहनचालक यांचे वाहतुक नियमांचे पालन करणेबाबत तसेच बदलण्यात आलेल्या सायलेन्सरच्या मोठ्या व कर्कश आवाजामुळे आजारी व्यक्ती,जेष्ठ नागरीक,लहान मुले यांचे वर होणाऱ्या दुष्परीणामांबाबत व अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत माहीती देवुन त्यांचे प्रबोधन करण्यात आले.सदरची विशेष मोहीम यापुढे देखील सातत्याने सुरु राहणार असुन पोलीस अधीक्षक तसेच अहमदनगर पोलीस दल यांचे वतीने सर्व वाहन चालक यांना आवाहन करण्यात येते की, आपण मोटार वाहन कायदयाचे पालन करुन आपले वाहन चालवावे.तसेच आपले वाहनावर चलानचा दंड प्रलंबित असल्यास सदर दंडाचे रक्कमेचा तात्काळ भरणा अन्यथा आपणाविरुध्द पुढील योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतुक नियमांच पालन करुन पोलीस दलास सहकार्य करावे.