अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून लैगींक अत्याचार करणा-या तरुणास भिंगार कॅम्प पोलीसांनी केले जेरबंद
अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ जुन):-अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून लैगींक अत्याचार करणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी केले अटक,बातमीतील हकीकत अशी की फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता पळवून नेले बाबत भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 312/2023 भादवि कलम 363 प्रमाणे दि.26 मे 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे संतोष उर्फ नाना राजु पवार वय 23 वर्षे रा.वडगाव सावताड,ता.पारनेर जि.अहमदनगर हल्ली मुक्काम कान्हूर पठार ता.पारनेर जि.अहमदनगर यांचा गुप्त बातमीदारा मार्फत तसेच तांत्रीक विश्लेषनद्वारे शोध घेतला असता ते कान्हूर पठार येथे मिळून आल्याने यातील पिडीत मुलगी हिच्या जबाब वरून सदर गुन्ह्यास भादवि 376(2)(N),366 सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधि.2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले असून आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक करून दि. 02 जुन 2023 रोजी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपी यास 04 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.पुढील तपास कॅम्प पोलीस करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक श्री.दिनकर मुंडे, पोसई/मंगेश बेंडकोळी,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहकाँ/गणेश नागगोजे,पोहेकाँ/बारगजे,पोहेकाँ/रघूनाथ कुलांगे,पोना/राहुल द्वारके,पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/रमेश शेख,चापोकाँ/भागचंद दरेकर,पोहेकॉ/संदीप घोडके,पोना/राहुल लगड,मपोकाँ/तृप्ती कांबळे,होमगार्ड/ज्ञानदेव जाधव, होमगार्ड/विशाल पवार यांनी केली आहे.