कत्तलीकरिता चालवलेल्या ४ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी केली सुटका;तीन महिन्यात आठवी कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ जुन):-कत्तलीकरिता चाललेल्या ४ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी केली सुटका,दि.३ जुन रोजी सायंकाळचे सुमारास कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,अहमदनगर कॉलेज मार्गे एक पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप मध्ये काही गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता घेवून जाणार आहेत अशी गुप्तबातमी मिळाल्याने पोनि/ चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सापळा लावुन सदर बोलेरो पिकअप पाठलाग करुन पकडला . तेव्हा त्यात १ ) २०,००० /- रु.किंची दोन मोठया जर्सी गाया त्यांचे तोंडावर पांढ – या तांबडे पटटे असलेल्या २)१०,००० /रु.किंची दोन लहान जर्सी गायचे वासरु त्यापैकी एक तांबडया रंगाचा तर दुसरा पांढरा व त्याचे तोंडाला तांबडा पटटा असलेला ( ३ ) २,००,००० / – रु.किंचा एक पांढरे रंगाचा बोलेरो पिकअप मालवाहतुक त्याचा पासींग क्रं MH १२ एन एक्स ९ ४२६ जुवाकिंअअसा एकुन २,३०,००० / रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन इसम नामे 1) गौस शेर मोहम्मद कुरेशी वय 38 वर्ष राहणार नालबंद खुंट अहमदनगर 2) समीर बाकर चौधरी वय 31 वर्ष राहणार नालबंद खुंट अहमदनगर यांच्या विरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात पोकॉ)कैलास दत्तु शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि नंबर/२०२३ महाराष्ट्र प्राणीरक्षा अधिनियम सन १ ९९ ५ चे कलम ५ ( ब ) ९ सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १ ९ ६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना/रियाज इनामदार हे करित आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/चंद्रशेखर यादव,पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/तनवीर शेख,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/अब्दुलकादर इनामदार,पोना/योगेश खामकर,पोना/ सलीम शेख,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/अमोल गाढे,पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/ कैलास शिरसाठ,पोकॉ/ सोमनाथ राऊत,पोकॉ/सागर मिसाळ,पोकॉ/अतुल काजळे यांनी केली आहे .