अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ जुन):-शहरातील सिध्दार्थनगर येथील खुनाच्या गुन्हयातील २०१८ पासुन फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं २८०/२०१४ भादविक ३०२,३०७,३६३,३६४,३४ प्रमाणे दि.०३/०६/२०१८ रोजी दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.गुन्हा घडल्या दिवसापासुन सदर गुन्हयातील आरोपी नामे रविंद्र कचरु पंडुरे (वय ३० रा.नेहुरगाव ता. गंगापुर) हा फरार होता. तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली पोनि.साळवे यांनी लागलीच अधिकारी व पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले.पथकाने त्याचा शोध घेतला असता तो पैठण जिल्हा औरंगाबाद येथे राहत असलेल्या माहीती वरुन त्यास पैठण पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून त्यास नमुद गुन्हयात अटक केली.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशात खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पोनि.श्री.मधुकर साळवे,सपोनि.श्री.नितीन रणदिवे,सपोनि.श्री.विश्वास भान्सी,पोसई/श्री.समाधान सोळंके,उपनिरी/बुरकुल नेम पैठण पोलीस स्टेशन व त्यांचे तपास पथक तसेच तोफखाना पोस्टेचे पोना/संदिप धामणे,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.
