नगर प्रतिनिधी(दि.२० जुन):-चार वर्षानंतर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला शोधून आरोपीला पकडण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि.२६/०३/२०१९ रोजी अज्ञात आरोपीताने पिडीत अल्पवयीन मुलीस पिंपळगाव माळवी ता.नगर.जि. अहमदनगर येथुन फुस लावुन पळवून नेले होते.या बाबत एमआयडीसी पोस्टे गुरनं/ १७२/२०१९ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास न लागल्याने तो दि.१३/०५/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहमदनगर यांचेकडेस तपासकामी वर्ग करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोसई/बाळासाहेब शिंदे हे करीत होते.वरील नमुद गुन्हा तपास कामी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष (AHTU) शाखेकडे तपास कामी वर्ग झाल्यानंतर त्या शाखेचे अधिकारी/अंमलदार वेगवेगळ्या मार्गाने व गुप्तबातमीदारामार्फत माहिती काढुन शोध घेत असतांना सदर अपहरीत मुलगी व आरोपी नामे राहुल सुरेश चिमणे रा.नेवासा हे लोणी प्रवरा ता.राहता जि. अहमदनगर येथे राहत असलेबाबत तपासात निष्पन्न झाल्याने त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी अधिकारी पोनि/संजय सानप यांचे आदेशाने या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी लोणी ता.राहता,जि.अहमदनगर येथे जावून तेथे अपहरीत मुलगी, आरोपी व सोबत त्यांचा एक दीड वर्षाचा मुलगा यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले.सदरचा गुन्हा पुढील तपासकामी मुळ कागदपत्रासह एमआयडीसी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.ही कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/संजय सानप,पोसई/बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ/२०२४ सय्यद,मपोकाँ/१३६५रांधवन,मपोहेकाँ/१०८२ पवार,चापोकाँ/२६७३ काळे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांनी केली आहे.
