नगर प्रतिनिधी(दि.२० जुन):-कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याची तक्रार केल्याच्या रागातून दोन युवकांवर तलवारीने वार करण्यात आले त्याच एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.ओंकार ऊर्फ गामा पांडुरंग भागानगरे (वय २४ वर्षे रा.पांचपीर चावडी, माळीवाडा) असे मयत युवकाचे नाव आहे व त्याच्या सोबत असलेला शुभम पाडोळे हा युवक जखमी झाला आहे.ही घटना काल सोमवारी २० जुन रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन दूकाना समोर घडली.या प्रकरणी तिघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओंकार रमेश घोलप (रा.माणिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे.
