प्रतिनिधी (दि.२० जुन):-श्रीगोंदा एसटी स्टॅण्डसमोर साईराज पान स्टॉलवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत जवळपास ५४,२३०/रु.किंचे.सुगंधी पान मसाला,विमल पान मसाला,रॉयल तंबाखूसह एका आरोपीस अटक केले.संतोष बबन दळवी (वय ४१ वर्षे राहणार रोकडोबा चौक श्रीगोंदा) याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोना/संतोष शंकर लोंढे यांच्या फिर्यादीवरून वरील इसमाविरूध्द भादविक १८८,२७२,२७३,३२८ प्रमाणे श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी ही कारवाई सोमवार दि.१९ जुन रोजी केली आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब किसन मुळीक,पोहेकॉ/अतुल लोटके,पोना/ संतोष लोंढे,चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.
