प्रतिनिधी(दि.२१ जुन):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात एक खळबळ जनक घटना घडली आहे.तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.19) जुन रोजी सकाळी एका 29 वर्षीय महिलेने पाच ते सहा जणांविरुद्ध विनयभंगांची फिर्याद दिली होती.दरम्यान दुपारच्या सुमारास या महिलेच्या फिर्यादीत आरोपी असलेली अलका बरकडे ही महिला गुन्हा दाखल करण्यासाठी आश्वी पोलीस ठाणे येथे आली असता प्रथम फिर्याद दाखल केलेल्या संबंधित महिलेने आरडाओरडा करत त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यास अडथळा आणत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.यावेळी पोलीस ठाण्यासमोर उभा असलेला तिचा भाऊ विकास अशोक मदने याने पेट्रोलची बाटली तिला आणून दिली व तुम्ही जर अलका बरकडे हिची तक्रार घेतली तर अंगावर पेट्रोल ओतुन मी व माझा भाऊ आत्महत्या करु असे म्हणत संबंधीत महिलेने अंगावर पेट्रोल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला.मात्र प्रसंगावधान राखत महिला पोलीस कर्मचारी चांडे, खेमनर तसेच पोलीस कॉस्टेबल काळे यांनी तात्काळ पळत जाऊन पेट्रोलची बाटली हिसकावुन घेतल्याने पुढील अनर्थ टळला.दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात संबंधीत महिला व विकास अशोक मदने (दोन्ही रा.आश्वी बुद्रुक,ता.संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 145/2023 नुसार भादंवीक 353,309,34 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे करत आहे.
