अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जुन):- ▶️ युनिट अहमदनगर
▶️ तक्रारदार- पुरुष वय- 60 जि.अहमदनगर
▶️आलोसे ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे पोलिस हवालदार ब. न.20 नेमणूक बेलवंडी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर
▶️ लाचेची मागणी- १००००/-₹ तडजोडी अंती ४०००/- रुपये
▶️ लाचेची मागणी दिनांक- ता.२१/०६/२०२३
▶️ लाच स्विकारली: ४०००/- ₹
▶️लाच स्विकारली दिनांक – २१/०६/२०२३
▶️ लाचेचे कारण यातील तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा अशांवर बेलवंडी पोलीस स्टेशन गु. र. न.२०९/२०२३ भा. द. वि.३२४, ३२३,५०४, ५०६,३४ प्रमाणे दिनांक १/६/२०२३ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात १२/६/२०२३ रोजी जामीन प्रक्रियेत मदत केली म्हणून व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी १००००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी ला.प्र. वि.कार्यालय अहमदनगर कडे तक्रार नोंदविली होती त्यानुसार आज दिनांक २१/६/२०२३ रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे पठारे यांनी प्रथम १००००/- लाच मागणी करून तडजोडी अंती ४०००/-रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज दिनांक २१/६/२०२३ रोजी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे सापळा कारवाई आयोजित केली असता पंचा समक्ष सदर लाच रक्कम ४०००/- रुपये स्वीकारली म्हणून बेलवंडी पोलीस स्टेशन येथे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.फोटोग्राफ्स घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारी:-गहिनीनाथ गमे,पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
▶️पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे,पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि,अहमदनगर
▶️सापळा पथक पोलीस अंमलदार पोशि कराड,महिला पोलीस नाईक राधा खेमनर
▶️ मार्गदर्शक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक
▶️माधव रेड्डी अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा:-नरेंद्र पवार,वाचक पोलीस उपअधीक्षक,मो. ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ आरोपीचे सक्षम अधिकारी पोलीस अधीक्षक अहमदनगर
