अहमदनगर प्रतिनिधी(दि.२२ जुन):-अवैध धंद्याची तक्रार दिल्याच्या कारणावरून ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा खून केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीनही प्रमुख आरोपी अद्याप पसार आहेत.मात्र,या प्रकरणी बुधवारी दि.२१ जुन रोजी तिघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.रात्री उशिरा तोफखाना पोलिसांनी त्यांच्या अटकेची कारवाई पूर्ण केली.दरम्यान,मुख्य आरोपींचा शोध सुरू असून,तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्यांना अटक केली जाईल,अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.वैभव हुच्चे,रवि नामदे व सागर गुडा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तीनही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.बुधवारी पोलिसांना तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काही संशयितांची चौकशी करण्यात आली.त्यानंतर हल्ल्यापूर्वी मयत भागानगरे,जखमी शुभम पडोळे व फिर्यादी ओंकार घोलप यांच्यावर पाळत ठेऊन त्याची माहिती आरोपींना पुरवणाऱ्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
