अहमदनगर प्रतिनिधी (दि.२२ जून):-अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहमदनगर शहर व परिसरात फिरून आरोपींची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नगर ते भिंगार जाणारे रोडवरील भिंगार नाला येथे साबीर सय्यद(रा. मुकुंदनगर, गोविंदपुरा) हा त्याच्या पाच साथीदारांसह हत्यारे घेऊन जात आहे.असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला कळल्यानंतर त्या पथकाने साबीर सय्यद याच्या भोवती सापळा रचला त्यावेळी भिंगारनाला परिसरात साबीर सय्यद आपल्या साथीदारांसह आला असता पोलिसांनी अचानक छापा टाकुन चार इसमांना जागीच ताब्यात घेतले तर दोन इसम झाडा झुडपांचा फायदा घेवुन पळुन गेले.साबीर अस्लम सय्यद,समी मुजीब शेख,अजहर गफ्फार शेख एक अल्पवयीन मुलगा यांच्या ताब्यातून १,५००/- रुपये किंमतीची एक तलवार, १,०००/- रुपये किंमतीची एक गुप्ती व ५,५००/- रुपये किंमतीचे दहा सुरे असा एकुण ८,०००/- हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.तर आयान समिर खान आणि सौरभ कथुरीया अशी फरार तरुणांची नावे असून हे सर्व तरुण मुकुंदनगर भागात राहत होते.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भिमराज किसन खर्से यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट ३०६/२३, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,पोसई/तुषार धाकराव,सफो/भाऊसाहेबकाळे,पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे,सुनिल चव्हाण,दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार,मनोहर गोसावी,पोना/रविंद्र कर्डीले,भिमराज खर्से,विजय ठोंबरे,संतोष लोढे,पोकॉ/मेघराज कोल्हे,अमृत आढाव व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केली आहे
