प्रतिनिधी (दि.२६ जुन):-अहमदनगर शहरात मोटार सायकल आडवुन जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना चोवीस तासाच्या आत 1,45,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
यातील फिर्यादी श्री. महेंद्र गोरखनाथ भनभणे (वय 42,रा.इवळे मळा, सारसनगर,अहमदनगर) हे टॉपअप पेट्रोल पंपा जवळुन त्यांचे ईलेक्ट्रीक मोपेड गाडीवरुन जात असताना मारुती 800 कार मधील अनोळखी तीन इसमांनी फिर्यादीची मोपेड गाडीस कार आडवी लावुन,दमदाटी करुन खिशातील रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन असा 46,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 693/2023 भादविक 392,341,34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पथक नेमुन गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथक अहमदनगर शहर परिसर फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा इसम नामे आदील सय्यद रा.मुकूंदनगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो सध्या मुकूंदनगर येथील पोलीस चौकीचे पाठीमागे मोकळ्या पंटागणात कारमध्ये बसलेला आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी मुकूंदनगर येथील पोलीस चौकीचे पाठीमागे मोकळ्या पंटागणा जवळ जावुन पाहणी करता दोन इसम पंटागणात मारुती 800 कारमध्ये बसलेले दिसले.पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीत इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1)आदिल निशान सय्यद वय 32,रा.मुकूंदनगर, व 2)जाबीर सादीक सय्यद वय 34,रा.गोविंदपुरा, मुकूंदनगर असे असल्याचे सांगितले.ताब्यात घेतलेल्या इसमांनाकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये फिर्यादीचा चोरी गेलेला 40,000/-रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन,5,000/- रुपये रोख रक्कम व आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली 1,00,000/- रुपये किंमतीची मारुती 800 कार असा एकुण 1,45,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/मनोहर गोसावी,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,पोना/सचिन आडबल,विशाल गवांदे,संतोष खैरे,फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव,जालिंदर माने यांनी केली आहे.
