अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ जुन):-जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला

या कार्यक्रमा करिता प्राचार्य श्री.मंगेश जगताप,प्राध्यापक व 800 ते 900 मुले व मुली उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ,दारु,गुटखा,तंबाखू,सिगारेट यांचे सेवन करु नये अंमली पदार्थांच्या सेवनाने कर्करोगासारखे गंभीर आजार होतात याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.तसेच व्यसनांच्या आहारी जाऊन तरूण तरूणी यांच्या हातुन कशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडतात याबाबतचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाने त्यांच्या भविष्यावर ही परिणाम होतो याची कल्पना दिली.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले आचार,विचार आणि वर्तणूक यावरही लक्ष देणे गरजेचे आहे त्यातच त्यांचा यशाची गुरुकिल्ली आहे.असा बहूमोल उपदेश ही केला.मुला-मुलींना शाळेत कोणी चिडवत असेल, शारीरिक आणि मानसिक त्रास देत असेल तर त्यांच्यावर रॅगिंग कायद्या अंतर्गत कारवाई होईल अशी तंबी दिली,जेणेकरुन शाळेतील वात्रट मुलांना धाक राहिल. तसेच मुलींना कोणी मुलगा त्रास देत असल्यास,छेडछाड करत असल्यास 112 नंबरला संपर्क करणेबाबत आव्हान केले आहे.आजकाल शाळकरी मुलांमध्ये मोबाईल फोन वापराचे प्रमाण खूप वाढले आहे,त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर व मनावर परिणाम होवून मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आहे.सोबत मोबाईल वर नको त्या गेम्स खेळणे,फेसबुक,इंस्टाग्राम, युटयुब यावर अकाउंट बनवून त्यावर आपले फोटो व्हिडिओ टाकणे,अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारणे, त्यांच्याशी संवाद साधणे त्यातून ही मुले सायबर गुन्ह्यांनाही बळी पडत आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करण्याबाबत मार्गदर्शन केले.सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास टोल फ्री क्रमांक 1930 यावर फोन करून तक्रार करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक सायबर सेल/स्थागुशा यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक/सचिन रणशेवरे, पोलीस नाईक/अभिजीत अरकल,पोलीस शिपाई/राहुल गुंडू यांनी केले आहे.
