अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ जुन):-बकरी ईदच्या अनुशंगाने अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे दहा आरोपींना अहमदनगर शहर व नगर तालुका हददीतुन हददपार करण्यात आले आहे.दि.29 जुन रोजी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद व हिंदु बांधवांची आषाढी एकादशी असे दोन्ही उत्सव एकाच दिवशी साजरे होत आहेत.त्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता अवैध्यरित्या गोवंशीय जनावरांचा छळ व वाहतुक करणा-या दहा आरोपींना उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांचेकडे प्रस्ताव पाठवुन त्यांना सीआरपीसी कलम 144 (2) प्रमाणे अहमदनगर शहर व तालुका यांचे भौगोलिक हददीतुन दि.28 जुन ते दि.29 जुन पर्यंत हददपार केले आहे.हद्दपार केलेले आरोपी 1)इरफान रफिक पठाण रा. जेउर ता.जि.अहमदनगर 2) अल्ताफ ईसाक शेख रा.जेउर.ता.जि,अहमदनगर 3)जाफर हबीब पठाण रा.जेउर 4)मोहम्मद नुर ईस्माईल शेख रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट अहमदनगर 5) सादीक अकबर चौधरी रा. तापकीर गल्ली गंजबाजार अहमदनगर 6)जावेद हबीब पठाण रा.जेउर ता.जि.अहमदनगर 7) गणेश मच्छिंद्र कुसमुडे रा.निंबळक ता.जि अहमदनगर 8) नितीन रामदास डुकरे रा.वांबोरी ता.राहुरी जि.अहमदनगर 9) कुमार बाळसाहेब कोरडे रा.गणेशनगर निंबळक ता.जि.अहमदनगर 10) शहबाज नवाज शफी कुरेशी रा. झेंडीगेट,सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनची सपोनि/राजेंद्र सानप,पोसई/पाठक,पोना/संदीप चव्हाण,पोना/दीपक गांगुर्डे,पोना/मिसाळ,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/उमेश शेरकर यांनी केली आहे.
