अहमदनगर प्रतिनिधी (दि.२७ जुन):-शासकिय रेशनिंग तांदळाची काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशिर वाहतुक करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेताना दि.२७ जुन रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,बीड येथील प्रकाशजी तोतला हा त्याचे हस्तका मार्फत बीड येथुन मुंबईला एका अशोक लेलंड कंपनीचा १४ टायर ट्रक मधुन रेशनिंगचा तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवुन जाणार आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना बोलावुन प्राप्त माहिती कळविली व पंचाना सोबत घेवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले व पथकास तात्काळ रवाना केले.पथकाने लागलीच नगर जामखेड रोडने जावुन कॉन्टोमेंटचा बंद पडलेला टोलनाका येथे ११.३० वाजेच्या सुमारास सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक अशोक लेलंड कंपनीचा १४ टायर ट्रक येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच वाहन चालकाने ताब्यातील ट्रक थांबवला.वाहनातील इसमांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) कृष्णा गोविंद ढाकणे,वय ३१ व २) विवेक रामभाऊ ढाकणे, वय १९,दोन्ही रा.धनगरवाडी, दोहीठाण,ता.आष्टी,जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले.त्यांचे ताब्यातील ट्रकची पहाणी करता त्यामध्ये तांदळाच्या गोण्या भरलेल्या दिसल्या.तांदळाच्या गोण्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदर माल हा ३) प्रकाशजी धनराजजी तोतला ( फरार) व ४ ) पवन प्रकाशजी तोतला (फरार) दोन्ही रा. वंजारगल्ली,जिल्हा बीड यांचे मालकीचा असुन बीड एमआयडीसी येथील महेश गृहउद्योग येथील पत्र्याचे शेडमधुन शासकिय स्वस्त धान्य वितरण योजनेतील ५० किलो वजनाच्या ६०० गोण्या तांदुळ दुसऱ्या इतर गोण्यामध्ये पलटी मारुन विना परवाना बेकायदेशिररित्या जवळ बाळगुन काळ्या बाजारात मुंबई येथे विक्री करीता घेवुन जात असल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.ताव्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन ६,४५,०००/- रुपये किंमतीच्या ५० किलो वजनाच्या ६०० तांदळाच्या गोण्या, २०,०००/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन व ५०,००,०००/- रुपये किंमतीचा एक विटकरी रंगाचा १९४ टायर ट्रक असा एकूण ५६,६५,०००/- रु. किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/२५१४ रणजीत पोपट जाधव ने.स्थागुशा यांनी भिंगार कॅम्प पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. ३९८/२०२३ जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कायदेशिर कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग,श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/सचिन आडबल व पोकॉ/रणजीत जाधव यांनी केली आहे.
