अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ जुन):-स्कॉर्पीओ मधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी कारवाई करून एकून 15,27,080/- मुद्देमाल जप्त केला आहे.दि.27 जुन रोजी रात्रीच्या कॉबींग ऑपरेश चालू असताना सपोनि/दिनकर मुंडे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, अहमदनगर शहारमधून एक पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी मधून अवैध दारू घेऊन काही इसम जामखेड रोडने जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने सपोनि/दिनकर मुंडे यांनी कॉबींग ऑपरेशन करीता नेमलेल्या अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणे कामी रवाना केले.अहमदनगर शहरामधील छावनी परीषदेच्या बंद पडलेल्या नाक्यावर नाकाबंदी लावली असता वरील वर्णणाचे वाहन सदर ठिकाणी आलेने वाहन चालकास हात दाखवून सदरचे वाहन उभी केले असता सदर वाहनाचा आरटीओ नं.एमएच 23 बी सी 4045 असा होता. स्कॉर्पीओची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये विवीध कंपनीच्या विदेशी दारूचे बॉक्स दिसून आल्याने सदरचे वाहन पोलीस स्टेशनला आणून आरोपी 1) शहादेव मारूती महाडीक वय 42 वर्षे रा.शेरी बुद्रुक,ता. आष्टी जि.बीड 2)नवनाथ दिलीप लोखडे वय 31 वर्षे रा. चांभार गल्ली कडा ता.आष्टी जि.बीड 3) अक्षय आजीनाथ महाडीक वय 27 वर्षे रा.शेरी बुद्रुक,ता.आष्टी जि.बीड यांचे कब्जामधून विवोध कंपनीच्या विदेशी दारूचे वॉक्स व एक स्कॉर्पीओ वाहन नं एम एच 23 बी सी 4045 असा एकून 15,27,080/- रू चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोस्टे गुरनं 402/2023 महा.दारूबंदी कायदा कलम 65(ई), 80 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संपत भोसले यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे,सफो/रमेश वराट,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकॉ/संदिप घोडके,पोहेकाँ/रेवन्नाथ मिसाळ,पोना/संतोष आडसुळ,पोना/दिपक शिंदे,पोकाँ/अमोल आव्हाड, चापोका/संजय काळे यांनी केली आहे.
