अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९ जुन):-अहमदनगर शहर पुन्हा एकदा हादरले असून खुनाच्या घटनेने भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून केडगाव परिसरात खून झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.जिल्ह्यात खून आणि दरोडे याचे सत्र सुरूच असून नगर शहरात मागील दोन आठवड्यापूर्वी खुनाच्या घटनेने शहर हादरले होते.ती घटना ताजी असतानाच तोच केडगाव उपनगरामधील केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरील एका वीट भट्टी जवळ एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून खून झाल्याची घटना समोर आली आहे.हा सर्व प्रकार समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा खून नेमका कोणाचा झाला याबाबत अद्यापही माहिती नसून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.अंदाजे 35 वर्षीय इसम असल्याचं माहिती समोर येत आहे.
