अहमदनगर प्रतिनिधी (दि.२९ जुन):-अहमदनगर शहरामध्ये आज मुस्लिम धर्मियांची ईद शांततेत पार पडली किंग्स गेट रोड परिसरातील ईदगाह मैदान याठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता ईदच्या नमाज पठनाचे आयोजन करण्यात आले होते.अतिशय उस्फुर्त व आनंदमयी वातावरणात मुस्लिम समाज बांधव ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज पठणासाठी एकत्र जमले होते.नमाज पठणा नंतर बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त ईदगाह मैदान येथे तैनात करण्यात आला होता.
