अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ जुलै):-एमआयडीसी मधील अपहार झालेली शेंगदाण्याची ट्रक मुददेमालासह व सराईत आरोपीच्या इनोव्हा कारसह ४१ लाख ३४ हजार रु किं.चा मुददेमाल जप्त करण्यात एमआयडीसी पोलिसांनी यश आले आहे.बातमीची हकीकत आशिकी,दि.०४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी येथिल प्लॉटन.ए. १३ येथुन आयशर ट्रकक्रं.एमएच.१८ बी.झेड. ००५४ या ट्रकमध्ये शेंगदाणा भरलेल्या २०० गोण्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ११,३४,०००/रु.किंमतीच्या यातील ड्रायव्हर भारत इसके (रा.कालुग्राम मोरीपुरा गंधवानी थार मध्यप्रदेश) याच्या ताब्यात इंदोर येथे पोहचविण्या करीता विश्वासाने वरील किंमतीचा माल सोपविण्यात आला होता परंतु सदर माल व ट्रक संबंधित ठिकाणी पोहचला नाही. म्हणुन यातील फिर्यादी हरीष ट्रेंडिंग शेंगदाणा कंपनीचे मालक कृष्णा इंदाणी (रा. कराचीवाला अहमदनगर तारकपुर एसटी स्टॅंड जवळ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं ५९८/२०२३ भादवीक ४०६,४०७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्याच्यात तपासाकामी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि/ राजेंद्र सानप यांनी एक पथक तयार केले.हे पथक संभाजीनगर (औरंगाबाद) कडे रवाना केले.पथकाने संभाजीनगर येथे शेंद्रा येथे सदर गुन्हातील आयशर टेम्पो क्रं एमएच.१८ बीझेड. ००५४ हा बेवारस स्थितीत मिळुन आल्याने त्याचा पंचनामा करुन जप्त केला.तसेच सदर ट्रकमधील शेंगदाणे गोण्या याचे तपास कामी जालना येथे जावुन सदर ड्रायव्हरने विकलेल्या शेंगदाणे गोण्या जालना येथील न्यू इंडीया शो रिपेअरिंग अॅन्ड बॉडी बिल्डरस या गॅरेज मधील नादुरुस्त आलेल्या ट्रकमध्ये लपवून ठेवलेल्या शेंगदाणे गोण्या एकुण ११,३४,०००/- रुपये किंमतीच्या गोण्या पंचनामा करुन हस्तगत केल्या.या गोण्या समीर मुन्ना शेख रा अंबड जि.जालना यांने लपवुन ठेवलेल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सदर इसम नामे समीर मुन्ना शेख याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी क्रंएमएच.४३ एन ७३३६ या कार मध्ये पळून जातांना तपास पथकाच्या निर्दशनास आला असल्याने त्यांनी सदर बाबत अंबड पोलीस ठाण्यात कळवले असता सदरचा इसम अंबड येथे सदर कार सोडुन पळुन गेलेला आहे.सदर इनोव्हा कारमध्ये वरील चोरी गेलेल्या मालापेकी ०४ शेंगदाणा गोण्या मिळुन आल्या आहेत.समीर मुन्ना शेख याचेवर जालना पोलीस स्टेशन येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरीश्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/श्री.राजेंद्र सानप,पोसई/गायकवाड,पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/प्रशांत धुमाळ व मोबाईल सेलचे पोशि/नितीन शिंदे,मपोशि/ज्योती काळे,मपोशि/रिंकी माढेकर यांचे पथकाने केलेली आहे.
