अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ जुलै):-मंदिरातील दानपेटी फोडुन चोरी करणारे दोन आरोपीना पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.यातील फिर्यादी श्री.देविदास सखाराम मोहळे (रा.सिद्धेश्वर मंदिर पुजारी,शिवनगर,पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की,दि. २३/०६/२०२३ ते दि. २४/०६/२०२३ रोजी पहाटे ५:३० वाजेचे सुमारास सिद्धेश्वर मंदिर,शिवनगर, पाईपलाईन रोड येथील मंदिराची दानपेटीचे कुलूप तोडुन त्यातील रक्कम चोरुन नेली आहे.या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९१९/२०२३ भा.दं.वि.क.३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पोना/संभाजी बडे हे करत होते.गुन्ह्याचे तपासात तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासुन आरोपी नामे विजय सुनिल यालल व आणखी एक आरोपी निष्पन्न करुन आरोपीचा शोध सुरू केला.त्यातच दि.०६/०७/२०२३ रोजी गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आरोपी विजय यालल हा रामवाडी परिसरात आलेला आहे. त्यावरुन तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार तात्काळ बातमी प्रमाणे जावुन खात्री करता आरोपी १) विजय सुनिल यालल,वय १९,रा-सिंधी कॉलनी,तारकपुर,२)रोहन अरुण साळवे,वय १८ रा. रामवाडी,ता.जि.अहमदनगर यांना ताब्यात घेतले असता दोघांनीही सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्ह्यात अटक केली आहे.त्यानंतर आरोपी विजय सुनिल यालल याने तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील सिद्धेश्वर मंदिर,डोकेनगर येथील साईबाबा मंदिर,सुर्या नगर येथील गणेश मंदिर,बालिकाश्रम येथील साईबाबा मंदिर,भिंगार येथील मानाचा गणपती मंदिर येथे दान पेटी फोडल्याची कबुली दिली.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि श्री. मधुकर साळवे यांच्या पथकातील श्री.नितीन रणदिवे,पो.उपनिरी समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट,पोना/ अविनाश वाकचौरे,संभाजी बड़े,संदिप धामणे,सुरज वाबळे,वसिम पठाण,अहमद इनामदार, पोकॉ/सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे,सतिष भवर,संदिप गिऱ्हे,गौतम सातपुते,सचिन जगताप,शफी सय्यद यांनी केली आहे.
