अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ जुलै):-सहा महिन्यानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले असून पथकाने परराज्यातील दोन आरोपींना अटक केले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि. 18/01/23 रोजी श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा गावचे शिवार येथील यशवंत बाबा चौका जवळ कोणीतरी अज्ञात इसमाने एका अनोळखी पुरुषाचे डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन,चेहरा विद्रुप करुन खुन केला व रोडचे बाजुला असलेल्या खड्डयात टाकुन पुरावा नष्ट केला या घटने बाबत पोना/मच्छिंद्र किसन शेलार,ने.श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.57/2023 भादविक 302, 201 प्रमाणे अनोळखी इसमा विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना ना उघड खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन,ना उघड गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद गुन्ह्याचा पोनि/श्री.दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे सखोल तपास करताना तपासात संशयीत मयत इसम हा मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे दिसुन येत असल्याने खात्री करणे कामी पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तसेच पोनि/श्री.हर्षवर्धन गवळी, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी त्यांचेकडील पोना/बिराप्पा करमल यास मदतीस घेवुन मध्यप्रदेश येथे पुढील तपासकामी रवाना केले. पथक मध्यप्रदेश राज्यात जावुन संशयीत मयत इसमाचा मोबाईल क्रमांकाचे पत्त्यावर जावुन खात्री करताना पथकास अशी माहिती प्राप्त झाली की, मोबाईल क्रमांक हा इसम नामे सोनु समरालाल चौधरी हा वापरत होता.परंतु सोनु चौधरी हा हरवले असले बाबत अमरपाटण पोलीस स्टेशन मध्यप्रदेश येथे तक्रार नोंद केली असल्याची सोनु चौधरीचे नातेवाईकांकडुन माहिती मिळाली.सोनु चौधरी याचे नातेवाईकांनी वर नमुद गुन्ह्यातील मयताचे फोटो दाखविले असता त्यांनी मयत इसम हा सोनु समरालाल चौधरी, वय 25,रा.खरवाही, ता.अमरपाटण,जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश हा असल्याचे त्याचे अंगातील कपडे व पायातील कडे पाहुण ओळखले.सोनु चौधरी यांचे बाबत नातेवाईकांकडे अधिक माहिती घेता मयत इसम हा त्याचा मित्र नामे भुपेंद्र शिवप्रसाद रबि वय 23, रा. सुनौरा,ता.अमरपाटण, जिल्हा सतना,राज्य मध्यप्रदेश सध्या रा.संजय नगर,श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर याचेकडे जातो असे सांगुन गेला असल्याची माहिती पथकास मिळाली.सदर भुपेंद्र रबि याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा शोध घेताना तो श्रीरामपूर येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन दिसुन आल्याने पथकाने मयत सोनु चौधरी याचे हरले बाबतचे अमरपाटण पोलीस स्टेशन येथुन सविस्तर माहिती प्राप्त केली.त्यानंतर पथकाने इसम नामे 1) भुपेंद्र शिवप्रसाद रबि वय 23, रा.सुनौरा, ता. अमरपाटण,जिल्हा सतना, राज्य मध्य प्रदेश सध्या रा. संजय नगर,श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा साथीदार नामे 2) सुरज रामनाथ रावत रा. सुनौरा,ता.अमरपाटण, जिल्हा सतना,राज्य मध्य प्रदेश सध्या रा.संजय नगर,श्रीरामपूर,जिल्हा अहमदनगर याचे मदतीने केल्याचे सांगितले.नशेत असताना त्याचे डोक्यावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारुन त्यास जिवे ठार मारले तसेच त्याची ओळख पटु नये म्हणुन त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याची हकिगत सांगितली.ताब्यातील दोन्ही इसमांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती. स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग,अतिरिक्त प्रभारी श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोसई/तुषार धाकराव,पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले,संतोष लोंढे,गणेश भिंगारदे,संतोष खैरे,फुरकान शेख,पोकॉ/सागर ससाणे,किशोर शिरसाठ,प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केली आहे.
