पाथर्डी प्रतिनिधी (दि.९ जुलै):-जिल्हा परिषद अहमदनगर आणि कोड टू इन्हान्स लर्निंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोड ऑन व्हिल्स’ ही विज्ञान यात्रा नगर जिल्ह्यात सुरू आहेत.या प्रवासात पाथर्डी तालुक्यातील कोल्हार जिल्हा परिषद शाळेत दोन दिवस या गाडीने विद्यार्थ्यांना कोडींग आणि थ्रीडी प्रिंटिंग या तंत्रज्ञानाचा अभ्यास शिकवला.”ही गाडी आमच्या भागात आल्यामुळे गावात एक चैतन्य आले असून लहान-मोठ्यांना या गाडीचे कौतुक आहे.आपल्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार २१ व्या शतकातील कौशल्ये ही कोड ऑन व्हील्स गाडी देत असल्याचे पाहून खूप आनंद झाला,तसेच हा दोन दिवसीय उपक्रम पुढे वर्षभर राबवावा”असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले.पहिल्या दिवशी विद्यार्थांना थ्रीडी प्रिंटर आणि कोडींग बद्दल शिकविण्यात आले.त्याच प्रमाणे त्यांना प्रत्येक्षात लॅपटॉप देऊन स्क्रॅच या एप्लिकेशन्सवर सराव करण्यास सांगितले.नंतर त्यांना समाजात जाणवणाऱ्या काही समस्या विचारात घेऊन कोड लिहिण्यास सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील “Observe -Brainstorm – Code – Pitch” या अध्यापनशास्त्र पद्धतीने स्टेप्स फॉलो करत त्या समस्येवर आनंदाने प्रोजेक्ट बनविले.कोल्हार जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री.राजेंद्र शिंदे, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग तसेच कोड टू इन्हान्स लर्निंग ट्रस्ट संस्थेच्या प्रीती मेश्राम,मीनाक्षी मॅडम) दुसऱ्या दिवशी उपस्थित मान्यवर,शिक्षक,जेष्ठ नागरिक आणि पालकांसमोर त्यांच्या प्रकल्पाचे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांनी केले,कोडींगच्या माध्यमातून समाजातील समस्या मांडल्या.हे सर्व बघून तिथे उपस्थित मान्यवर, पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.शाळेतील या कार्यक्रमाला कोल्हार ग्रामपंचायत सदस्य राजू नेटके, संदीप सर,ज्योती गोरक्ष,अभिजित अशोक,सोपान,नवनाथ सर, सुशीला दे.नेटके,माधुरी गर्जे तसेच कोड टू इन्हान्स लर्निंग ट्रस्टच्या प्रीती मेश्राम,मीनाक्षी मॅम आणि गाडीचे वाहक रमेश बनसोडे उपस्थित होते.जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष येरेकर तसेच शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनात या सुंदर उपक्रमाची आखणी झाली असून,हा प्रकल्प पुढे जिल्हाभर राबविण्याबाबत कोड टू इनहांस लर्निग ट्रस्टचे संस्थापक इरफान ललानी यांनी संकल्पित केले आहे.
