अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ जुलै):-मोक्का व दरोडा गुन्ह्यात मागिल ५ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की,दि.११/०२/१९ रोजी फिर्यादी श्री.दत्तात्रय बंडु ननवरे (वय ४८,रा.दौंड,जिल्हा पुणे) हे मारुती कारमधुन कुटूंबियासह जाताना मातोश्री हॉस्पीटल काष्टी ते दौंड जाणारे रोड,ता. श्रीगोंदा येथे लघुशंकेसाठी थांबलेले असताना अनोळखी ५-६ इसमांनी चाकुचा धाक दाखवुन ३,४८,१००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने,रोख रक्कम,मोबाईल फोन,घड्याळ व मारुती कार दरोडा चोरी करुन चोरुन नेले होते.या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरनं.१५४/२०१९ भादविक ३९५ प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात पाच आरोपी निष्पन्न करुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले होते व इतर तीन आरोपी अद्याप फरार होते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हयातील गंभीर गुन्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक कर्जत परिसरात फरार आरोपींचा शोध घेताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी नामे मिथुन काळे,रा.आखोणी, ता. कर्जत हा त्याचे राहते घरी आला आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि / आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीचे ठिकाणा बाबत माहिती घेवुन बातमीतील वर्णना प्रमाणे एका संशयीतास ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मिथुन बंड्या काळे,वय ३०,रा.आखोणी,ता.कर्जत असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले.आरोपी नामे मिथुन बंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर,सोलापुर व पुणे जिल्ह्यातील गंभीर स्वरुपाचे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास श्रीगोंदा पोस्टे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ/अतुल लोटके,पोना / रविंद्र कर्डीले,विजय ठोंबरे, पोकॉ/रोहित मिसाळ, आकाश काळे,बाळु खेडकर व भाऊसाहेब काळे यांनी केली आहे.

