अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ जुलै):-महात्मा फुले जयंती मध्ये कट रचून जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.दि.11 एप्रिल 2023 महात्मा फुले जयंती दिनापासून गुन्हा करून हे आरोपी फरार होते.गुरवार दि.13 जुलै 2023 रोजी कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनि.श्री.दिनकर मुंडे यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की यातील आरोपी निलेश सुनिल पेंडुलकर रा.पाटील गल्ली भिंगार व अभिषेक उर्फ अभ्या अशोक शेलार रा.घासगल्ली भिंगार अहमदनगर हे भिंगार शहरात वडारवाडी येथे आले आहेत.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून वरील दोन आरोपींना अटक केली.वरील दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पो.स्टे.सहाय्यक पोलीस निरीक्षक/ दिनकर मुंडे,पोसई/मंगेश बेंडकोळी,सफो/कैलास सोनार,पोहेकॉ/रेवननाथ दहीफळे,पोहेकॉ/संदीप घोडके,पोना/दिपक शिंदे,पोना/राहुल द्वारके,पोकॉ/ रमेश दरेकर,पोकॉ/अमोल आव्हाड यांनी केली आहे.
