प्रतिनिधी(१४ जुलै):-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन,नगर विकास,माहिती व तंत्रज्ञान,माहिती व जनसंपर्क,परिवहन,सामाजिक न्याय,पर्यावरण व वातावरणीय बदल,खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह,विधी व न्याय,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन ही खाते
२६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे
*छगन भुजबळ –अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
*दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार
*राधाकृष्ण विखे-पाटील –महसूल,पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
*सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने,सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
*हसन मियाँलाल मुश्रीफ –वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
*चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
*विजयकुमार कृष्णराव गावित-आदिवासी विकास
*गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
*गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता
*दादाजी दगडू भुसे-सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
*संजय दुलिचंद राठोड-मृद व जलसंधारण
*धनंजय पंडितराव मुंडे-कृषि
*सुरेशभाऊ दगडू खाडे-कामगार
*संदीपान आसाराम भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन
*उदय रविंद्र सामंत-उद्योग
*प्रा.तानाजी जयवंत सावंत-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
*रवींद्र दत्तात्रय चव्हाण –सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
*अब्दुल सत्तार-अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
*दीपक वसंतराव केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा
*धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम –अन्न व औषध प्रशासन
*अतुल मोरेश्वर सावे –गृहनिर्माण,इतर मागास व बहुजन कल्याण
*शंभूराज शिवाजीराव देसाई-राज्य उत्पादन शुल्क
*कु.अदिती सुनिल तटकरे महिला व बालविकास
*संजय बाबुराव बनसोडे –क्रीडा व युवक कल्याण,बंदरे
*मंगलप्रभात लोढा-कौशल्य विकास,उद्योजकता व नाविन्यता
*अनिल पाटील – मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन
