अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५ जुलै):-नगर शहरातील व्यापारी मोहल्ला येथून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे तब्बल 1910 किलो गोमांस,11 जिवंत जनावरे असा मिळून 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.दिलेल्या आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,यांनी दि.15 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावुन घेवुन कळविले की,आताच गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे सोफीयान कुरेशी(रा.व्यापारी मोहल्ला अहमदनगर) हा एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जिवंत जनावरांना विना चारापाण्याचे डांबुन ठेवुन अमानुष वागणुक देवुन कत्तल करीत आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थागुशा पथकास पंचाना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथक तात्काळ रवाना केले.पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता व्यापारी मोहल्ला येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम गोवंश जिवंत जनावरांची कत्तल करताना दिसले.पथकाची खात्री पटताच अचानक छापा टाकुन तीन इसमांना जागीच ताब्यात घेतले.व पोलीसाची ओळख सांगुन त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) मोहम्मद कैफ अब्दुल मस्जित कुरेशी वय 19, 2) अब्दुल आसीफ कुरेशी वय 19 व 3) शाहिद मुनाफ कुरेशी वय 21 सर्व रा. ब्यापारी मोहल्ला,अहमदनगर असे सांगितले.त्यांचे कडे सदर कत्तलखान्या व गोवंश जनावरे या बाबत विचारपुस करता त्यांनी सदर कत्तलखाना इसम नामे 4) सोफियान अय्याज कुरेशी रा. ब्यापारी मोहल्ला,अहमदनगर (फरार) याचे मालकीचा असुन तो चालवतो असे सांगितले.त्याचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातुन 3,82,000/- रुपये किंमतीचे 1,910 किलो गोमास,1,20,000/- अकरा (11) लहान मोठी जिवंत जनावरे व 500/- रुपये किंमतीचा सत्तुर व सुरा असा एकुण 5,02,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या बाबत पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे ने.स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर याचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. 776/2023 म.प.सु.अ.चे कलम 5 (क), 9 (अ) सह प्रा.नि.वा.क.3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोना/सचिन आडबल,संतोष लोढे,पोकॉ/शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव,जालिंदर माने,सागर ससाणे, रोहित येमुल व अमृत आढाव यांनी केलेली आहे.
