अहमदनगर प्रतिनिधी(दि.१५ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तसेच शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे यश क्लासेसचे शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 मध्ये तब्बल अकरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून इयत्ता आठवी मधील कु.अनीषा कोठावळे 300 पैकी 250 गुण मिळवून जिल्ह्यात आठवी आली. तसेच मयूर खेडकर,निकिता गवळी,निखिल पाटील,श्रेयस सोनवणे,नीरज पाटील, कुशल पाटील,भक्ती वाघ व पूजा पाटील या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.इयत्ता पाचवी मधील रुद्रप्रताप आवारे या विद्यार्थ्याने सुद्धा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना यश क्लासेसचे संचालक प्राध्यापक सचिन संभाजी पुंड यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
