अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ जुलै):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सजन्न नाऱ्हाडा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.राहुरी तालक्यातील दवनगाव येथील पिडीत महिलेशी त्यांची ओळख झाली होती.व्हाट्सऍपद्वारे त्यांची चॅटिंग होत होती व याचाच फायदा घेत राहुरी स्टेशन रोडवरील खाजगी रुमवर बळजबरीने या महिलेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहॆ.या पोलीस उपनिरीक्षकांवर सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याने राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याचे तीव्र पडसात सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशनात उमठले आहे.
