मला ज्ञान आहे म्हणून मी बोलतो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आला तर मी बोलणारच रोहित पवारांचा राणेंना प्रत्युत्तर
जामखेड प्रतिनिधी (दि.१५.डिसेंबर):-भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार तसेंच शरद पवारांचे नातु रोहित पवारांवर टीका केली होती. कोणत्याही गोष्टी मध्ये अँँमेजॉनच्या अँँलेक्सा प्रमाणे सर्वच गोष्टीत बोलने योग्य नाही तु शरद पवारांकडून काही तरी शीक असा एकेरी उल्लेख करत टीका केली होती.दरम्यान यासंदर्भात रोहित पवारांनी राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.मला ज्या गोष्टीचा ज्ञान आहे त्या विषयात मी बोलत असतो.महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असों कीं महापुरुषांच्या अपमानाचा विषय मी बोलणारच तसे ते माझे मित्र आहे मात्र मी त्यांच्या सारखा त्या लेवल जाऊन नाही बोलणार ज्या विषयात मला ज्ञान आहे ते बोलणार असे प्रत्युत्तर आ.रोहित पवारांनी दिले आहे.