Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाची नगरमध्ये मोठी कारवाई

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१५. डिसेंबर):-राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभमीवर राज्यउत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाची नगरमध्ये मोठी कारवाई गोवा राज्य निर्मात मद्य साठ्यावर मोठी कारवाई या भरारी पथकाने केली आहे.आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क डॉ.विजय सुर्यवंशी,संचालक श्री.सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये व विभागीय उपआयुक्त श्री.अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक, नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर मोठया प्रमाणावर मद्याचे सेवन केले जाते.त्याकरीता गोवा राज्य निर्मीत मद्याची अवैधरित्या मोठया प्रमाणात आवक केली जाते.त्या अनुषंगाने निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक,पुणे विभाग,पुणे या पथकाने मोहिम राबवून वाहनांच्या तपासणी दरम्यान दि.१५ डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्हयातील,आरणगाव गावचे हददीतील,दौण्ड – अहमदनगर रोडच्या डाव्या बाजूस,हॉटेल सारंग समोर आयशर कंपनीचा ११.१० प्रो बीएस ४ मॉडेलचा तांबडया रंगाचा सहा चाकी टेंम्पो क्र. MP.13/GA 8061 थांबवून वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता,सदर वाहन चालकाने वाहनामध्ये ऑईलने भरलेले प्लास्टीकचे बॅरल असून ते गोवा येथून घेवून प्रितमपुर,इंदौर,मध्यप्रदेश या ठिकाणी घेवून जात असल्याचे सांगून त्याबाबतची बिल पावती दाखविली.परंतु मिळालेल्या माहितीनुसार सदर वाहनाची खातरजमा करण्याकरीता सदर वाहनामधील प्लास्टीकचे बॅरलची पाहणी केली असता काही बॅरल पाण्याने भरलेले व काही रिकामे मिळून आले. सदर बॅरलच्या मागे वाहनामध्ये गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या ब्रॅण्डच्या १८० मि.ली.क्षमतेच्या ३३६०० सिलबंद बाटल्या (७०० बॉक्स) मिळून आले. वाहन चालकाकडे मद्य वाहतूकीचे संदर्भातील कोणताही वाहतूक पास,परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत.तसेच सदरचा मद्य साठा विक्री करण्याचे उददेशाने वाहतूक करुन आणल्याचे आरोपीच्या तपासातून स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ,ई,८१,८३,९० व १०३ अन्वये गु.र.क्र. ४५८/२०२२नुसार गुन्हा नोंद करुन सदर ठिकाणावरुन वरील वर्णनाचा विदेशी मद्याचा साठा,आयशर कंपनीचा सहा चाकी टेंम्पो क्रमांक MP13/GA 8061 तसेच प्लास्टीक बॅरल व आरोपीकडील एक मोबाईल फोन असा एकूण रु. ५४,०२,५००/- किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करण्यात आला.तसेच जप्त वाहनामध्ये मिळून आलेला इसम नामे रजत आसाराम पांडे (वय २३ वर्षे रा.घर नं. १४,वॉर्ड नं.१६ रोलगाव ता. सिराली जि.हरदा,मध्यप्रदेश) यास जागीच अटक करुन ताब्यात घेण्यात आले आहे.सदरची कारवाई निरीक्षक श्री.दिगंबर शेवाळे,दुय्यम निरीक्षक एस.व्ही.बोधे,ए.सी.फडतरे,जवान स्टाफ प्रताप कदम,सतीश पोंधे,अनिल थोरात,अमर कांबळे, अहमद शेख,भरत नेमाडे,अमोल दळवी तसेच निरीक्षक,दुय्यम निरीक्षक श्री. प्रदिप झुंजरुक व जवान श्री.प्रविण सागर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page