Maharashtra247

अखेर शिव पाणंद शेतरस्त्यांचा उच्च न्यायलयाचा आदेश पारनेर तहसिलदारांकडे सुपुर्द;पारनेरच्या तहसीलदारांनी उच्च न्यायालयाचा सन्मान राखत शेतकऱ्यांना न्याय द्यावा याचिकाकर्ते शरद पवळे

 

पारनेर प्रतिनिधी:-पारनेर तालुक्यात गेल्या सहा वर्षांपासुन सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीला विविध आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप निर्माण झाले असुन राज्यातील अनेक शेतकरी या चळवळीमध्ये सक्रिय होत असुन अनेक तालुक्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरीक पुढाकार घेत असुन यामध्ये प्रामुख्याने शेतरस्त्याच्या शेवटच्या व्यक्तीला मोठा संघर्ष याठिकाणी करावा लागत आहे याचा गांभिर्याने विचार करत पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहाने याचिकर्ते शरद पवळे यांनी ॲड. प्रतीक्षा काळे यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय ,औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक ८२४७/२०२३ मधील१७/०७/२०१७ रोजीच्या निर्णयानुसामार पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिव पाणंद शेतरस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याबाबतचा आदेश काढण्यात आला सदर आदेशास अनुसरून दि.११/११/२०२१ रोजी महाराष्ट्र शासन नियोजन विभाग रोहोयो, रोहोया विभाग यांनी विविध योजनेच्या अभिसरणमधुन मातोश्री ग्रामसमृधी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यात शासण निर्णयातील नमुद मजकुरानुसार तालुका तालुका पातळीवर तहसिलदार यांनी शेतकरी व नागरीकांचे शेत पाणंद व शिव रस्त्याबाबत प्रश्न निकाली काढण्याबाबत पुढाकार घ्यायाचा आहे.सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकामी यापूर्वी पारनेर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या याचिकेवर मा. उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्यांचे प्रश्न शामण निर्णय ११/११/२०२१ मधील सुचनांचे पालन येत्या ६० दिवसाच्या आत निकाली काढण्याबाबात पारनेर तहसीलदार यांना आदेशीत केले आहे. सदर निकाल व याचिकेच्या प्रत अर्जासोबत जोडत शिवपाणंद शेत रस्त्यांसाठी त्रस्त झालेले वर्षानुवर्षे या रस्त्यांचा प्रश्नामुळे दळवळण, आपापसातील तंटे यांचे वाढलेले प्रमाण यामुळे मामलेदार कोर्टात मोठ्या प्रमाणावर केसेस दाखल होत आहेत दि.११/११/२०२१ शासण निर्णयानुसार प्रत्यक्ष पाहणी करत पाणंद व शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन सदर रस्ते खुले केल्यास शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील यां संदर्भातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या जोडून दिलेल्या तपशीलानुसार प्रत्यक्ष पाहणी व नंतर सुनावणी घेत निकाली काढाव्यात व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे यासंदर्भातील निवेदन, उच्च न्यायालय आदेश प्रत पारनेर तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना देताना याचिकाकर्ते शरद पवळे यांसह शेतकरी रामदास लोणकर, विजय दळवी, तुषार दळवी, भाऊसाहेब वाळूंज, दशरथ वाळूंज, हौसीराम कुदळे, शंकर गवळी, सतीष शिरोळे, बाळासाहेब धोतरे, सचिन वाघूले, दिनेश वाघुले आदिंसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page