गजानन हाॅस्पिटलमधील मोफत शिबिरात ६० कर्णबधीर बाल रुग्णांची तपासणी
अहमदनगर प्रतिनिधी:-अहमदनगरमध्ये कान- नाक – घसा विकारांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या गजानन हाॅस्पिटलमध्ये कर्णबधीरपणा तपासणीच्या ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी समुपदेशन’ शिबिरात 60 बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन माेहनीराज काशीद यांनी दिली. या शिबिरात 25 बाल रुग्णांची मॅपिंग चाचणी करण्यात आली. तर दहा रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले. त्याबाबत अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संजय घाेगरे आणि अतिरीक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. साहेबराव डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेतला जाईल, असे डाॅ. गजानन काशीद यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हे शिबिर रविवारी अहमदनगरमधील दिल्ली दरवाजा येथे असलेल्या गजानन हाॅस्पिटलमध्ये पार पडले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. साेनाली बांगर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वरिष्ठ अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महावीर कटारिया, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैजनाथ गुरवले, कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अहमदनगरमधील वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुनीता चाैरे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे अहमदनगरमधील समन्वयक विजय दळवी, डाॅ. राहुल पवार, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळ, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल आदी उपस्थित हाेते. डाॅ.साेनाली बांगर म्हणाल्या, “राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत हे शिबिर गजानन हाॅस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडले. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी’ माेफत आहे. पूर्वी अशा रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई किंवा पुणे येथे जावे लागत हाेते. परंतु गजानन हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रणेमुळे अहमदनगरमध्ये लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांवर हे उपचार करणे शक्य झाले. त्याचा अनेक रुग्णांना नक्कीच फायदा होत आहे.डाॅ. गजानन काशीद म्हणाले, “कर्णबधीर असलेल्या बाल रुग्णांसाठी ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी’ खूप गरजेची असते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशन शिबिर घेऊन याविषयी जनजागृती केली. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांसाठी हे शिबिर वरदान ठरले आहे. या शिबिरात 60 बालरुग्णांची तपासणी झाली. यातील 25 जणांची मॅपिंग चाचणी झाली, तर 10 रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे समाेर आले.अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महावीर कटारिया, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैजनाथ गुरवले, विजय दळवी, राहुल पवार यांनी मनाेगत व्यक्त केले. या शिबिरात अहमदनगर जिल्ह्यासह बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातून रुग्ण सहभागी झाले हाेते. ऐकायला कमी येणाऱ्या बालकांवर ‘मॅपिंग व काॅक्लियर इम्प्लांट सर्जरी’ किती उपयुक्त आहे, याची माहिती पालक प्रसाद शेंडकर यांनी दिली. तसेच ज्या बालकावर ही शस्रक्रिया यशस्वी झाली आहे, त्याने उपस्थितांसमाेर नाव, गाव, शाळा आणि पत्ता अशी सर्व माहिती सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. गजानन काशीद, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. प्रशांत निर्मळ, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. विठ्ठल उंडे, ऑडिओलॉजिस्ट डाॅ. अमृता दिवाणमल यांनी केली. औषध निर्माता सुनील साेनवणे आणि सारिका धुमाळ, परिचारिका प्रियंका तांबे, गजानन हाॅस्पिटलचे मानव संसाधन विभागप्रमुख विनाेद लठाड, दीपक गायकवाड, अविनाश पावडे, दिगंबर निवलकर, तेजस्विनी चाेरगे, परिचारिका पाैर्णिमा चव्हाण, अश्विनी उबाळे, अंजली बेंद्रे, प्रियंका पवार, चंद्रभागा धिंदले, फिराेज सय्यद, विकास वायाळ, प्रदीप कराळे, अक्षदा म्याना तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अहमदनगर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, परिचारीका, मदतनीस, आशा वर्कर्स यांनी शिबिर यशस्वी हाेण्यासाठी परिश्रम घेतले. ओंकार व्यवहारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.