Maharashtra247

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.१ ऑगस्ट):-दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत फरार आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार नमुद सुचने प्रमाणे सोनई, शनिशिंगणापुर परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शनिशिंगणापुर येथील दरोड्याचे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अजय काळे (रा. मक्तापुर,ता.)नेवासा हा त्याचे राहते घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले.पथकाने लागलीच मक्तापुर,ता.नेवासा येथे जावुन आरोपीचा शोध घेत असताना तो मुक्तापुर परिसरात मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)अजय मिरीलाल काळे (वय 23,रा.मक्तापुर,ता. नेवासा)असे असल्याचे सांगितले.त्याचेकडे शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन गु.र.नं.78/2019 भादविक 395,341 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला.त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शनिशिंगणापुर पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे अजय मिरलाल काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, दरोडा तयारी व जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,विशाल दळवी, पोकॉ/किशोर शिरसाठ,सागर ससाणे यांनी केली आहे.

 

 

You cannot copy content of this page