अहमदनगर प्रतिनिधी:-ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र – १ ही योजना सुरू करून जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याचेअसलेले हक्काचे पाणी लाभधारक गावांना देण्यात यावे.अन्यथा दि.९ ऑगस्ट रोजी अधीक्षक अभियंता व प्रशासक जलसंपदा यांच्या दालनासमोर मुक्काम ठोको आंदोलन करण्याचा इशारा जिप.माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता व प्रशासक शेटे बी.के. व कार्यकारी अधिकारी प्रमुख जगदीश मधुकर पाटील, कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की,अॅड शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्य हर्षदा ताई काकडे यांनी तालुक्यातील मौजे वाडगाव येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार (शेवगाव तालुक्यातील ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र – १ मध्ये १) वरूर खु २) वरूर बु ३) आखेगाव (डोंगर व तितर्फा ) ४) थाटे ५) खरडगाव ६) वाडगाव ७) सालवडगाव ८) मुर्शदपूर ९) हसनापूर या गावांना पाणी मिळावे अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांची मागणी . तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी दि.२३/०१/२०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार जलसंपदा खात्याने याबाबत ड्ट प्रस्ताव सादर केलेला आहे.ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र – १ ही बंद स्थितीतील योजना आहे. याच योजनेचे १.८ टी.एम.सी पाणी हे वरील गावांना देण्याबद्दल मा. अधीक्षक अभियंता व प्रशासक अहमदनगर मध्यम प्रकल्प विभाग अहमदनगर यांनी शासनाकडे योग्य ती टिपणी सादर केलेली आहे. तथापी यांस शासन स्तरावर मान्यता मिळालेली नाही. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न उपेक्षित राहिलेला आहे. सबब जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याचेअसलेले हक्काचे पाणी या वरील ९ गावांना देण्याबाबतच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देऊन प्रकल्पाचे काम सुरु करावे या मागणीसाठी दि.०९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांती दिनी सकाळी ठीक १०.३० वा आपल्या जलसंपदा भवन येथील कार्यालयाला वरील ९ गावांचे शेतकरी ” प्रदक्षिणा आंदोलन ” करतील.या आंदोलनानंतर त्याच ठिकाणी हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मुक्काम ठोको आंदोलन ” करतील. वरील मागणीसाठी या सर्व गावातील शेतकरी याच ठिकाणी मुक्काम ठोकून राहणार आहेत. यावेळी लहू जायभाये, दादापाटील सातपुते, बळीराम शिरसाठ, नवनाथ ढाकणे, विक्रम ढाकणे, शेषराव ढाकणे, अर्जुन खंडागळे, सरपंच सर्जेराव जवरे, महादेव जवरे, डॉ.अंकुश दराडे, माणिकराव म्हस्के, गणेश मोरे, कानिफनाथ उभेदळ, मच्छद्रिं वावरे, शिवाजी वावरे, उद्धव वावरे, अजिनाथ लांडे, नारायण टेकाळे, शिवाजी औटी, सकाहरी भापकर, बाप्पासाहेब लांडे, भगवान डावरे, भाऊसाहेब बोडखे, ज्ञानेश्वर बोडखे, राजेंद्र लोणकर, एकनाथ बोडखे, आदिनाथ धावणे, रंगनाथ ढाकणे, श्रीधर धावणे, बाबासाहेब ढाकणे, मुरलीधर धावणे, अशोक गोर्डे उपसरपंच, भगवान गोर्डे, पाराजी मराठे, राहुल पाबळे, अशोक कोल्हे आदी उपस्थित
