अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ ऑगस्ट):-एका वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एमआयडीसी येथील मंदिराच्या प्रांगणात १ ऑगस्ट रोजी नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला तरुण वर्ग वयोवृद्ध व महिला देखील उपस्थित होत्या.मात्र दरम्यान हुल्लडबाजांनी स्टेट समोरच एकमेकांच्या खांद्यावर बसून वाकडेतिकडे नाचत दगडफेक करत गोंधळ घातल्याने गौतमी पाटीलने हा कार्यक्रम अर्ध्यावरच आटोपला व आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणार नसल्याचं देखील गौतमीने स्पष्ट सांगितलं आहे.नवनागापूरमधील कार्यक्रम रद्द करत गौतमी पाटील म्हणाली,”मी खूप दिवसांनी नृत्याचा कार्यक्रम करत होते.माझ्या कार्यक्रमा दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रेक्षक गर्दी करतात.अनेकदा समोर बसलेल्या प्रेक्षकांमुळे मागच्या प्रेक्षकांना दिसत नाही.त्यामुळे गोंधळ होत असतो. आताही तेच झालं.त्यामुळे मी लगेचच कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.पण प्रत्येक आयोजकाला मला सांगायचं आहे की,बंदोबस्त व्यवस्थित करा.माझ्या कार्यक्रमात जर नेहमीच गोंधळ होणार असेल तर मी इथून पुढे कार्यक्रम बंद करते आणि खरचं करेल असे गौतमी पाटील म्हणाल्या.यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला असला तरी हुल्लडबाज तरुण काही ऐकण्याच्या तयारीत नव्हते.
