अहमदनगर प्रतिनिधी(दि.२ ऑगस्ट):-नगर शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून खून,मारामारी,दरोडे या घटना वाढल्या आहेत.आज पुन्हा नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयाच्या समोर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे यामध्ये महाविद्यालयीन तरुण युवराज गुंजाळ हा गंभीर जखमी झाला आहे.त्याला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मात्र हल्लेखोर पसार झाले.तोफखाना पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
