प्रतिनिधी(३ ऑगस्ट):-शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारीश्री.संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे या बाबत खात्रीशिर बातमी मिळाली.त्याप्रमाणे त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 1 पिडीत मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि दौलत किसन लटके, अकुश संजय घोडके या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी DySP संदीप मिटके यांचे कौतुक केले.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील,इरफान शेख,कुऱ्हे,शिंदे,जाधव, भांगरे,गांगुर्डे यांनी केली.
