अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ ऑगस्ट):-अहमदनगर शहरातील प्रेमदान चौक येथे एका प्रकल्पाचे काम सुरू आहे.परंतु या कामादरम्यान धोकादायक क्रेन या ठिकाणी उभारण्यात आली आहे.या क्रेनमुळे नगर मनमाड महामार्गावर अपघात होऊ शकतो,मोठी जीवित हानी या ठिकाणी घडू शकते नगररचना विभागाने एक नोटीस दिली की जर संबधित प्रकल्पाने ती क्रेन काढली नाही तर कायदेशीर कारवाई करू असे सांगितले होते.तरी सुद्धा कारवाई होत नाही म्हणून संबंधित प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी अहमदनगर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड यांनी केली होती.परंतु कोणतीही दखल मनपा प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत नाही,त्यामुळे संतप्त झालेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मनपाचे नगररचनाकार चारठनकर यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड,जिल्हानेते सोमा शिंदे,शहराध्यक्ष किरण जाधव,प्रज्ञशील पाटेकर आदी उपस्थित होते.
