अहमदनगर (५ ऑगस्ट):-शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्रतिष्ठित जुगार अड्डयावर छापा घालुन जुगार खेळणा-या नऊ इसमावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर हे दि. 04 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,इसम नामे रजनीकांत रायचंद अंधारे बालमटाकळी शेवगांव हा घराचे जवळ आडोश्याला उघड्यावर काही लोकांना घेवुन तिरट नावाचा हारजीतीचा जुगार पैसे लावुन खेळत आहे.आता गेल्यास मिळुन येईल,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन,पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. पथकाने लागलीच इसम नामे रजनीकांत अंधारे याचे घराजवळ बालमटाकळी,ता. शेवगांव येथे जावुन खात्री करता काही इसम घराचे आडोशाला गोलाकार बसुन हातामध्ये पत्ते घेवुन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले.पथकाची व पंचाची खात्री होताच अचानक छापा टाकला व तेथे बसलेल्या इसमांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता बसलेल्या इसमांनी त्यांची नावे 1) रजनीकांत रायचंद अंधारे वय 30,रा.बोधेगांव,ता.शेवगांव, 2) संदीप बाबासाहेब बांमदळे,वय 36,रा. बालमटाकळी,ता.शेवगांव, 3) अंबादास विश्वनाथ राठोड वय 32,रा.नागलवाडी,ता. शेवगांव,4)लियाकत रज्जाक शेख वय 32, रा.बोधेगाव,ता. शेवगांव, 5)गौरव रायचंद अंधारे वय 24,रा.बोधेगांव, ता.शेवगांव, 6)कमरुद्दीन दगडु शेख वय 46,रा. बालमटाकळी, ता. शेवगांव, 7) शाहरुख निसार शेख वय 28, रा.बोधेगांव,ता.शेवगांव, 8) लियाकत बादशहा शेख वय 40, रा.बालमटाकळी,ता. शेवगांव,9) लक्ष्मण रघुनाथ मार्कड वय 51,रा.रामनगर, ता.पैठण,जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगुन सदर जुगार क्लब हा रजनीकांत अंधारे चालवित असल्याचे सांगितले.वरील नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत रोख रक्कम, पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोटार सायकल व वेगवेगळ्या प्रकारचे आठ मोबाईल फोन व तिरट जुगारीची साधने असा एकुण 4,95,980/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पोकॉ/जालिंदर मुरलीधर माने,ने.स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं 765/2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोना/सचिन आडबल,पोकॉ/शिवाजी ढाकणे,पोकॉ/रणजीत जाधव,जालिंदर माने,रोहित मिसाळ,विजय धनेधर,बाळु खेडकर यांनी केलेली आहे.
