अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ ऑगस्ट):-दि. ०४ ऑगस्ट रोजी पिडीत महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,दि. ०५/०३/२०२१ रोजी ‘पासून त्यांची आरोपी नामे ज्ञानेश्वर राजेंद्र हापसे (रा.भिंगार अहमदनगर) याचे सोबत इंस्टाग्राम वर ओळख झाली होती.त्या ओळखीच्या आधारे आरोपीने फिर्यादीस वेळोवेळी बाहेर भेटण्याचे बहाण्याने बाहेर घेवुन जावुन तीच्या इच्छेविरुध्द तिच्याशी शाररिक संबंध ठेवले व फिर्यादीस शाररीक व मानसिक त्रास दिला.आरोपी फिर्यादीस शरीरसंबंध ठेवण्यासाठी फोटो,व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत होता.वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८८१/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६(२) (एन), ५०४,५०६ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधि १९८९ चे कलम ३(१)(डब्ल्यू) (T) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हयाचा तपास अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर हे करत आहेत.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हयातील आरोपी नामे ज्ञानेश्वर राजेंद्र हापसे हा भिंगार वेशीजवळ आलेला आहे.अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी त्यास तेथे जावुन ताब्यात घेवून सदर आरोपीस तात्काळ पोलीस ठाणे येथे आणुन अटक केली असून सदर आरोपीस आज दि.०५ ऑगस्ट रोजी न्यायालय अहमदनगर येथे रिमांडकामी रिमांड रिपोर्टसह हजर केले असता सदर आरोपीस न्यायालयाने दि.०८/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार तनवीर शेख,योगेश भिंगारदिवे,सलीम शेख,अभय कदम,अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.
