अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ ऑगस्ट):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.5) ऑगस्ट रोजी रात्री नगर शहरात घडली आहे.दरम्यान,सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या युवकाला अवघ्या अर्धा तासातच नगर शहरातून ताब्यात घेतले.अरमान नईम शेख (रा.मुकुंदनगर) असे या युवकाचे नाव आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी युवकाने आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड केले.सदरची रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली.आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
