अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ ऑगस्ट):-तोफखाना पोलिसांनी विविध ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाई करत एकूण दहा हजार ८४० रु.चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि.५ ऑगस्ट रोजी तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या विविध पथकांनी पोलीस स्टेशन हद्दीमधील राज चेंबर कोठला येथे इमारतीच्या तिस-या मजल्यावर हुक्का पार्लरवर छापा टाकुन ७४००/-रु.किं.चे हुक्का पिण्यासाठी लागणारे काचेचे पॉट,हुक्का फ्लेवर व हुक्का पिण्यासाठी लागणारे पाईप जप्त केले.तसेच पाइपलाईन रोड येथील यशोदानगर भाजी मार्केट येथे कल्याण मटका टपरीवर छापा टाकला असता एकास ताब्यात घेवून त्याचे कब्जातून १२८०/-रु.रोख रक्कम व कल्याण मटका नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी जुगाराची साधणे जप्त केली.पद्मावती चौक डि मार्टच्या समोरील पत्र्याच्या टपरीमध्ये कल्याण मटका नावाचा जुगार सुरू असताना तिथे छापा टाकून 960/-रु रोख रक्कमेसह कल्याण मटका नावाच्या जुगाराच्या एक इसम साधनासह मिळून आल्याने त्याचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर बालाजी मंदिरासमोर असलेल्या पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला छापा टाकुन एका इसमाच्या ताब्यातुन 1200/- रु.किं.ची 12 लि.गावटी हातभट्टीची तयार दारु मिळुन आल्याने प्रोहीबीशन अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अनिल कातकडे,तोफखाना पोलिस निरीक्षक श्री.मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि./समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाठ,अविनाश वाघचौरे,अहमद इनामदार,वसिम पठाण,सुरज वाबळे, संदिप धामणे,पोकॉ/सतिष त्रिभुवन,शिरीष तरटे,सचिन जगताप,दत्तात्रय कोतकर,गौतम सातपुते,सतिष भवर, संदिप गि-हे यांनी केली आहे.
.
