अहमदनगर (दि.६ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील २ अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या आरोपींना २४ तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्ह्यातील राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केल्या बाबत दि.४ ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं.८४८/२३ भादविक ३५४, ३५४ (ड),५०६ सह पोक्सो का.क. ८,१२ व अजाजकाक.३ (१) (आर), ३ (१) (डब्लु) (१) गुन्हा दाखल होता.तसेच कोपरगाव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवून नेले बाबत दि.५ ऑगस्ट रोजी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.३७२/२३ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल होता.या दोन्ही घटना अत्यंत संवेदनशिल असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पिडीत अल्पवयीन मुलीचा व वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके नेमुन पिडीत अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना देवून पथकास तात्काळ रवाना केले.पथक प्रथम राहुरी येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने स्थागुशा बीड येथे नेमणुकीस असलेले पोना/मनोज वाघ यांना मदतीस घेवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन आरोपी नामे १)शाहनवाज असिफ शेख वय २१,रा.वांबोरी,ता. राहुरी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील तपास कामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक कोपरगांव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा प्रथम पुणे, लोणावळा येथे शोध घेतला. परंतु ते नवी मुंबई येथील वाशी या ठिकाणी असले बाबत माहिती प्राप्त होताच पथकाने वाशी पोलीस स्टेशनचे पोसई/निलेश बारसे यांना मदतीस घेवुन पिडीत व आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करुन पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे १)तौफिक मिटु पठाण, रा.बोधेगांव,ता.शेवगांव हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व डॉ.श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग व श्री.संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/बबन मखरे,शरद बुधवंत,पोना/रविंद्र कर्डीले,संतोष लोंढे,संदीप दरदंले,सचिन आडबल,फुरकान शेख,पोकॉ/बाळू खेडकर,रणजीत जाधव,शिवाजी ढाकणे,रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड,मपोना/भाग्यश्री भिटे,मपोकॉ/ज्योती शिंदे,चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ/अरुण मोरे पोलीस यांनी केली आहे.
