अहमदनगर (दि.८ ऑगस्ट):- दि.७ ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशन तोफखाना येथे फिर्याद दिली होती की,मी रस्त्याने जात असताना एक अनोळखी मुलाने पाठलाग करुन तुझे नाव काय मला तु आवडतेस असे म्हणुन तीचेशी ओळख जुळवण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं 1133/2023 भा.द.वि.कलम 354 (ड) सह बालकांचे लैगीक अत्याचारापासुन संरक्षण कायदा 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपीचे वर्णनावरुन त्यास दोन तासात ताब्यात घेवुन पोलिसांनी त्याला अटक केले.अटक केलेल्या आरोपीस न्यायालया समोर समोर हजर केले असता त्याला न्यायालयाने दि.१० ऑगस्ट पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली.पुढील तपास पोउपनिरी/एस.आर.रणशेवरे करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला पोलीस,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग,तोफखाना पोनि.श्री.मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोउपनिरीक्षक समाधान सोळंके,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण,पोकॉ/संदिप गि-हे पोकॉ गौतम सातपुते,पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/सतीष त्रिभुवन यांचे पथकाने केली आहे.
