अहमदनगर(दि.८ ऑगस्ट):-बड्डे आहे भावाचा..! गंगा उद्यान ते पंकज कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये वाढदिवस साजरा करुन उच्छाद करणाऱ्या टवाळखोर बड्डे बॉयसह बड्डे बॉयचे सर्व मित्रांवर तोफखाना पोलीसांनी पोलीस कायदा कलम 110/117 प्रमाणे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करत मुलांना पालकांच्या स्वाधीन केले.ही घटना दि.८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास घडली.गंगा उद्यान ते पंकज कॉलनी कडे जाणाऱ्या रोडवर काही मुले रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन आरडा ओरडा करत असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी बातमीची दखल घेवुन तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह गंगा उद्यान ते पंकज कॉलनी जाणाऱ्या रोडवर गेले असता या ठिकाणी काही मुले रोडवर वाहने आडवी लावुन,आरडा ओरडा करत वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसुन आले.त्यामुळे रोडवरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत असल्याचे तसेच पायी चालत येणाऱ्या नागरींकाना त्रास होत असल्याचे दिसुन आले.त्यावर वाढदिवस साजरा करत असलेल्या मुलांना पोलीस आल्याचे दिसुन आल्याने अनेकांनी धुम ठोकली.बड्डे बॉय सह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्ये आणले व त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा विचार करुन त्यांच्यावर कठोर कारवाई न करता त्यांना योग्य ती कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर वरील मुलांच्या पालकांना समक्ष पोलीस स्टेशनला बोलावुन घेवुन यापुढे असे टवाळखोर कृत्य करणार नाही या आश्वसनावर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्याकडुन नागरीकांना नम्र आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,कॉलेज, क्लासेसला जाणाऱ्या मुलांच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे. आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत,ते बाहेर काही टवाखोरी करतात काय? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनवणुक करणारी इसमे आढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी.
