मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला
राहाता प्रतिनिधी (दि.१७.डिसेंबर):-मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश नामदेव लुटे यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान प्राणघातक हल्ला झाला असून साकुरी येथील हॉटेलवर गुरुवार दि.१५ डिसेंबर रोजी रात्री ७:३० च्या सुमारास हा हल्ला झाला.या हल्ल्यात चाकू व लोखंडी मुठीचा वापर करण्यात आला.यामध्ये लुटे गंभीर जखमी झाले असून,शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.राजेंद्र लुटे यांनी राहाता पोलिस ठाण्यात शुक्रवारी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.पुढील तपास राहता पोलीस करीत आहेत.